राजापूर : जैतापूरचा राजा मंडळाच्या पुढाकाराने घेरा यशवंतगड किल्ला परिसराची स्वच्छता

Aug 20, 2024 - 11:59
Aug 20, 2024 - 12:12
 0
राजापूर : जैतापूरचा राजा मंडळाच्या पुढाकाराने घेरा यशवंतगड किल्ला परिसराची स्वच्छता

राजापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या राजापूर तालुक्यातील नाटे येथीला घेरा यशवंतगड किल्ला आणि परिसराची स्वच्छता जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी केली. बुरूज, विहीर परिसरासह किल्ल्यावर वाढलेली झाडीही तोडून टाकली, त्यामुळे किल्ल्याचे रूपडे पालटले आहे. गणेशोत्सव मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सण, उत्सव साजरे करताना विविध सामाजिक बांधिलकी जोपासणारेही उपक्रम दरवर्षी राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून मंडळातर्फे नाटे येथील मेरा यशवंतगड किल्ल्याची स्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार किल्ल्याची स्वच्छतामोहीम राबवण्यात आली. नाटे येथील शिवसाय संघटनेचे अध्यक्ष मनोज आहविरकर यांच्या हस्ते गडावरील श्री महापुरुषाला श्रीफळ अर्पण करून त्या स्वच्छतामोहिमेला सुरुवात केली. या मोहिमेत मंडळाचे संस्थापक सचिव, सल्लागार गिरीश करंगुटकर, अध्यक्ष राकेश दांडेकर, विलास डंबे, विजय कुनकुवळेकर, नाटेनगर विद्यामंदिरचे शिक्षक, श्री देव वेताळ मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, दळे ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या मोहिमेमुळे यशवंतगड किल्ला आणि परिसराची स्वच्छता व साफसफाई झाली आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 20/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow