केदार जाधवकडून क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर

Jun 3, 2024 - 16:37
Jun 3, 2024 - 17:08
 0
केदार जाधवकडून क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा मराठमोळा स्टार क्रिकेटर केदार जाधवनं (Kedar Jadhav) मोठा निर्णय घेतला आहे. केदार जाधवनं महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni ) प्रमाणं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली आहे.

केदार जाधवनं वयाच्या 39 व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. केदारनं दुपारी तीन वाजता ही पोस्ट करुन निवृत्ती जाहीर केली. भारतीय क्रिकेट संघात केदार जाधवनं अखेरची मॅच फेब्रुवारी 2020 मध्ये न्यूझीलँड विरुद्ध खेळली होती.

केदार जाधव सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन माहिती दिली. माझ्या करिअरमध्ये पाठिंबा आणि प्रेम देणाऱ्या सर्वांचे धन्यवाद, दुपारी तीन वाजल्यानंतर क्रिकेटच्या सर्व प्रकारातून मला निवृत्त मानलं जावं, असं केदार जाधवनं म्हटलं.

केदार जाधवने 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. केदारनं भारतासाठी 73 एकदिवसीय सामने खेळले. यामध्ये त्यानं 42.09 च्या सरासरीनं 1389 धावा केल्या होत्या. त्यानं या धावा101.60 च्या स्ट्राईक रेटनं केल्या होत्या. केदार जाधवनं 2 शतकं झळकावली असून 6 अर्धशतकं झळकावली आहेत.

केदार जाधवनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजीच्या जोरावर 27 विकेट घेतल्या आहेत. केदारनं 2015 मध्ये झिम्बॉब्वे विरुद्ध टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं 9 मॅचमध्ये 20.33 च्या सरासीरनं 122 धावा केल्या होत्या.

केदार जाधवची पोस्ट

केदार जाधवनं भारतीय संघासाठी काही मॅचेसमध्ये फिनिशरची भूमिका बजावली होती. महेंद्र सिंह धोनीनं केदार जाधवला बऱ्याचदा संधी दिली. केदार जाधवनं 93 आयपीएल मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 22.15 च्या सरासरीनं 1196 धावा केल्या. केदार जाधवनं आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चैलेंजर्स बंगळुरु, सनरायजर्स हैदराबाद, कोची टस्कर्स केरळ आणि दिल्ली डेअरडेविल्स या संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:34 03-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow