एन. एस. चॅम्पियन ट्रॉफी कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने जिंकली

Jun 4, 2024 - 09:07
 0
एन. एस. चॅम्पियन ट्रॉफी कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने जिंकली

◼️ सार्थक देसाईचे दुसरे झंझावती शतक

रत्नागिरी - कोळंबे येथील सावंत (सोसा) स्टेडियमवर एन. एस. क्लब नवी मुंबई, सांगली क्रिकेट क्लब व कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमी, रत्नागिरी या संघांमध्ये टी-२० लीग तिरंगी क्रिकेट स्पर्धा गेली चार दिवस आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेमध्ये कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने सांगली क्रिकेट संघाचा दोनदा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला व नवी मुंबई संघाने सांगली संघाचा पराभव केल्यामुळे अंतिम सामना कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमी व एन.एस. क्लब नवी मुंबई यांचेमध्ये झाला. 

सदर सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने वीस षटकात ३ बाद १८५ धावा केल्या. त्यामध्ये सार्थक देसाई याने सलग दुसरे झंझावती शतक झळकावले. त्यामध्ये पाच चौकार व ११ षटकारांची आतिष बाजी केली. त्याला अनुज देसाई याने ३० धावा करून मोलाची साथ दिली. एन.एस. क्लब नवी मुंबई यांचेकडून गोलंदाजी करताना त्यांच्या सूर्यवंशी-१, सणस-१ व भाविन देसाई-१ यांनी बळी घेतले. सदर अॅकॅडमीच्या धाव संख्येला प्रत्युत्तरादाखल उतरलेल्या एन.एस. क्लब नवी मुंबई यांनी सर्व गडी बाद ९० धावा केल्या. त्यामुळे कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने ९५ धावांनी सदरचा अंतिम सामना जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. एन. एस. क्लब नवी मुंबई यांचेकडून रोनक पटेल-२९, सौराष्ट्र पटनायक-१६ व सणस व म्हारगुडे यांनी प्रत्येकी ९ धावा केल्या. तर कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीच्या श्रेयस शिंदे-३, सार्थक देसाई-२, किरण सुर्वे २ व अर्णव भाटकर-१ असे गडी बाद केले.

अंतिम सामन्यानंतर बक्षिस वितरण समर्थ रोडलाईन्सचे श्री. गजेंद्रशेठ पाथरे, अथर्व पाथरे, हॉटेल गोपाळचे मालक व रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य श्री. लाल्याशेठ खातू, पावस येथील उद्योजक श्री. शेखरशेठ नानरकर, श्री. राजूशेठ खातू, अॅड. अजित कदम व रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य श्री. सुनिल घोसाळकर या मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. बक्षिस समारंभाचे सूत्रसंचालन श्री. दीपक देसाई यांनी केले.

१) विजेता संघ : कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमी (सीडीसीए), 
२) उपविजेता संघ एन.एस. क्लब, नवी मुंबई, 
३) मालिकावीर : कु. सार्थक देसाई (सीडीसीए), 
४) उत्कृष्ठ फलंदाज कु. सार्थक देसाई (सीडीसीए), 
५) उत्कृष्ठ गोलंदाज : कु. श्रेयस शिंदे (सीडीसीए),
६) उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक: कु. गुरुप्रसाद म्हस्के, 
७) मॅन ऑफ दी मॅच कु. सार्थक देसाई (सीडीसीए), 
८) उत्तेजनार्थ: कु. रोहन कदम (एन.एस. क्लब, नवी मुंबई

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:33 04-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow