खेड : जगबुडी पूल वाहतुकीला खुला

Aug 22, 2024 - 14:00
 0
खेड : जगबुडी पूल वाहतुकीला खुला

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल एका महिन्यानंतर बुधवारी सकाळपासून पूर्ववत करण्यात आली. २२ जुलैला सायंकाळच्या सुमारास जगबुडी पुलावरील एक मार्गिका मध्यभागीच उखडल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. दोन्ही मार्गांवरील वाहतूक एकाच मार्गिकवरून सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

राष्ट्रीय महामार्ग विभागाने ३ दिवसांत उखडलेल्या मध्यभागाची दुरुस्ती करून वाहतुकीसाठी पूल खुला करण्याचे संकेत दिले होते. उखडलेल्या मध्यभागी सळ्या टाकून मजबुतीसाठी त्यावर रॅपिड हार्डनिंग सिमेंट वापरण्यात आले आहे. दरम्यान, जुलै महिन्यात सलग पंधरा ते वीस दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे दुरुस्तीकामात अडथळा निर्माण झाला होता. गेले आठवडाभर पावसाने उसंत घेतली आहे; मात्र पुलाच्या दुरुस्तीचे काम संथगतीनेच सुरू होते. सद्यःस्थितीत एकाच मार्गिकवरून दोन्ही दिशेने येणारी वाहने सोडण्यात येत होती. मुंबईहून येणारी वाहतूक कमी असली तरीही वाहन चालवणे धोकादायक ठरत होते. आगामी कालावधीत गणेशोत्सव असल्यामुळे हा पूल वाहतुकीला खुला होणे आवश्यक होते. बुधवारी सकाळपासून या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 22/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow