लांजातून ४३ वर्षीय एकजण बेपत्ता
लांजा : देवगडहून चिपळूणकडे जाणारा ४३ वर्षीय तरुण लांजा बस स्थानक येथून बेपत्ता झाल्याची फिर्याद लांजा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा चिपळूण तालुक्यातील गोवळकोट भोईवाडी येथील रहिवासी असलेला प्रदीप शंकर भातवकर (वय ४३) हा देवगड येथे कामाला असून तब्येत बरी नसल्याने तो ९ ऑगस्ट रोजी देवगडहून चिपळूण येथे आपल्या गावी चालला होता तेव्हा बेपत्ता झाला आहे. लांजा पोलिस याबाबत अधिक तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 22-08-2024
What's Your Reaction?