मातृप्रेरणा अंकाचे आज रत्नागिरीत प्रकाशन

Aug 24, 2024 - 10:05
Aug 24, 2024 - 10:46
 0
मातृप्रेरणा अंकाचे आज रत्नागिरीत प्रकाशन

रत्नागिरी : येथील राष्ट्रसेविका समितीचे रत्नकोंदण आणि रेणुका प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने मातृशक्तीचा गौरव करणारा मातृप्रेरणा अंक आणि कुसुम या हस्तलिखित कुसुम या दोन्ही अंकांचे प्रकाशन शनिवारी, दि. २४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे.

समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रत्नागिरी शहर कार्यवाह वरुण पंडित, विवेकचे प्रतिनिधी भरत इदाते उपस्थित राहणार आहेत. सन्मित्रनगर येथील कै. विमलबाई पित्रे मुलींच्या वसतिगृहात शनिवारी सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन रत्नकोंदण प्रमुख आणि रेणुका प्रतिष्ठानच्या अध्यक्ष दीपा पाटकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 24-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow