रत्नागिरी : वातावरण बदलाने मासेमारीत अडथळा

Aug 24, 2024 - 13:10
 0
रत्नागिरी : वातावरण बदलाने मासेमारीत अडथळा

रत्नागिरी : मागील आठवडाभर वातावरणाने साथ दिल्यामुळे मच्छीमारांना बांगडा, व्हाईट चिंगूळ, चालू चिंगूळ मिळत होते. काहींच्या जाळ्यात पापलेट सापडल्यामुळे मच्छीमार सुखावते; परंतु गेले दोन दिवस किनारी भागात वातावरण बदलल्यामुळे समुद्रही खवळला आहे. त्यामुळे गिलनेट मासेमारी ठप्प झाली आहे. ट्रॉलिंगने मासेमारी करणाऱ्या मोजक्याच नौका समुद्रात गेल्या असल्या तरीही मासे मिळत नसल्यामुळे त्यांच्या पदरी निराशाच आलेली आहे.

हवामान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. येत्या दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यताही वर्तवली आहे. काल रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पश्चिम बंगालमध्ये वादळाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. वातावरण बदलत्या हा परिणाम कोकण किनारपट्टीवरही दिसू लागला आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात सर्वत्र वारा आणि पाऊस सुरू आहे. बदलत्या वातावरणामुळे मासे खोल समुद्रात गेले आहेत. याचा परिणाम मच्छीमारीवर झालेला आहे. गिलनेटद्वारे मासेमारी करणारे मच्छीमार सुरक्षे कारणास्तव बंदरातच आहेत. त्याचबरोबर ट्रॉलिंगसह फिशिंग मासेमारी करणारे काही मचोमार समुद्रात धोका पत्करून मासेमारीसाठी गेले होते; परंतु ते निराशच झालेले आहेत.

मागील आठवडाभर गिलेटने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना १० ते १५ जाळी (१ जाळ्यात ३२ किलो मासळी) मासे मिळत होते. त्यामध्ये बांगडा, व्हाईट पिंगूल, चालू पिंगळे, टायनीचा (छोटी चिंगळे) समावेश होता. मोठ्या चिंगळांना किलोला ३५० रुपये दर मिळत आहे. बांगडा १२० ते १४० रुपये किलोने विकला गेला. छोट्या आकाराची कोळंबी १२० रुपये किलोने विकली गेली. गतवर्षपेक्षा ५० रुपये किलोला अधिक दर मिळत होता. काही मच्छीमारांच्या जाळ्यात पापलेट मिळाल्याने दिलासा मिळाला होता. जाळीला १० ते १२ किलो पापलेट मिळाले, किलोला ४०० रुपये दर मिळाला होता. हवामानातील बदलाचा परिणाम २७ पर्यंत राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गेले दोन दिवस वातावरण बिघडले असून, त्याचा परिणाम मासेमारीवर झालेला आहे. गिलनेटने मासेमारी करणाऱ्यांनी नौका बंदरात उभ्या केल्या आहेत. खवळतेला समुद्र शांत होण्याची प्रतीक्षा करत आहेत. सुरुवातीला चांगला रिपोर्ट मिळत होता अभय लाकडे मच्छीमार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:38 PM 24/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow