रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व तालुका कार्यकारिणीची आज खेडमध्ये विशेष सभा

Aug 5, 2024 - 09:41
Aug 5, 2024 - 10:04
 0
रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  व तालुका कार्यकारिणीची आज खेडमध्ये  विशेष सभा

गणपतीपुळे : रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी यांची विशेष सभा सोमवार दि. ५ रोजी सकाळी ११ वाजता खेड तालुका भरणा नाका येथील बिसू हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

ही सभा ही जिल्हा अध्यक्ष प्रीतम रुके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर राज्य कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य, दलित मित्र पुरस्कार विजेते दादासाहेब मर्चेंडे, कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांत सकपाळ हे मान्यवर उपस्थित राहून खेड येथे दि.२४ ऑगस्ट रोजी घेण्यात येणाऱ्या भव्य रिपाइंच्या मेळाव्याबाबत नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आहे. आठवले यांची दि. २७ जुलै रोजी जिल्हा कार्यकारिणी व सदस्य यांनी भेट घेऊन पक्षबांधणी, मेळावा, सत्कार समारंभ या कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा केली आहे.

त्याचबरोबर नामदार रामदास आठवले यांच्या २० सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथे जिल्ह्याच्या वतीने भव्य सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या बाबतही नियोजन या सभेत करण्यात येणार आहे.

तरी रत्नागिरी जिल्हा रिपाइं कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी सदस्य, हितचिंतक यांनी दि.५ ऑगस्ट रोजी खेड येथे होणाऱ्या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया अध्यक्ष प्रीतम रूके, जिल्हा सचिव आदेश मर्चेंडे यांनी केले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 05/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow