सुपारी समजून आणलेली वस्तू निघाली गावठी बॉम्ब; फोडताना हातातच झाला स्फोट

Aug 26, 2024 - 11:58
 0
सुपारी समजून आणलेली वस्तू निघाली गावठी बॉम्ब; फोडताना हातातच झाला स्फोट

कुडाळ : शेतामध्ये गुरांसाठी चार कापण्यासाठी गेले असताना सुपारी समजून घरी आणलेली वस्तू गावठी बॉम्ब निघाली. सुपारी म्हणून फोडत असताना तिरचा स्फोट होऊन संबंधित शेतकरी जखमी झाला. ही घटना तालुक्यातील माणगाव खोर्‍यातील एका गावात घडली आहे.

माणगाव खोर्‍यातील एक शेतकरी सकाळी आपल्या शेतात गुरांसाठी लागणारी चार कापण्यासाठी गेले होते. यावेळी चार कापत असताना त्यांना त्या ठिकाणी सुपारी सदृश्य एक वस्तू मिळाली. त्यांनी ती सुपारी आहे असे समजून घरी आणली. घरी आणल्यावर ती सुपारी फोडण्याच्या धारदार हत्याराने ती फोडत असताना अचानक त्याचा स्फोट झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तो शेतकरी व त्याच्या कुटुंबातील सर्वजण गोंधळून गेले. या शेतकर्‍याच्या हाताला दुखापत झाली असून वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान हा गावठी बॉम्ब सदृश्य स्फोटक पदार्थ असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहेत. अशा प्रकारचे गावठी बॉम्ब जंगल भागात वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी वापरले जातात. मात्र या गावठी बॉम्ब सदृश्य स्फोटक पदार्थामुळे जंगली प्राण्याऐवजी शेतकरीच यात जखमी झाला आहे. याबाबत कुडाळ पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी जबाब नोंदवून याबाबतची योग्य ती कारवाई करण्या स सुरुवात केली आहे. ही स्फोटक वस्तू शेतात नेमके आली कशी? कोणी ठेवली याबाबत कुडाळ पोलिस तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 26-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow