गुहागरमध्ये नदीतील दहीहंडी ठरली आकर्षण

Aug 28, 2024 - 10:22
Aug 28, 2024 - 10:37
 0
गुहागरमध्ये नदीतील दहीहंडी ठरली आकर्षण

गुहागर : गुहागर शहरातील खालचापाठ जंगळवाडी येथील नदीतील दहीहंडी ठरली आकर्षण. जांगळवाडी गोविंदा पथकाने ही दहीहंडी फोडली. गुहागर खालचापट जांगळवाडी येथे नदी आहे. या नदीत गेले तीन वर्ष दहीहंडी बांधून फोडण्याचा उपक्रम जांगळवाडीवासीयच करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नदीतील वाहत्या पाण्यात चार थरांची हंडी बांधण्यात आली होती. या हंडीला आकर्षक बक्षीसही लावण्यात आलेले होते. वाहत्या पाण्यात थर रचण्यासाठी गोविंदा पथकाला थोडे त्रासदायकच होत होते. ही चार थरांची दहीहंडी जांगळवाडी येथील गोविंदा पथकानेच फोडली. ही दहीहंडी बघण्यासाठी शहरातून गर्दी झाली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 28/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow