नाटे गावात बिबट्याचा संचार; नागरिक भयभीत
राजापूर : तालुक्यातील नाटे गावात बिबट्याच्या मुक्त संचारा मुळे येथे भीतीचे वातावरण आहे. याबाबतचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओ मध्ये रात्रीच्या वेली बिबट्या फिरताना दिसत आहे. तसेच इतर काही नागरिकांनी देखील सायंकाळच्या वेळेला बिबट्याला फिरताना पहिले असल्याचे बोलले जात आहे. तसेच गावातील कुत्र्यांना या बिबट्याने भक्ष केल्याचे देखील बोलले जात आहे. वनखात्याने याची तातडीने दखल घेत या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 11-09-2024
What's Your Reaction?