ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन

Aug 28, 2024 - 10:22
 0
ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे (Suhasini Deshpande) यांचं निधन झालं आहे. पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी सुहासिनी देशपांडे यांनी अखेरचा श्वास घेतला.

वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. दरम्यान सुहासिनी यांच्या जाण्याने कलाविश्वात शोककळा पसरली आहे.

सुहासिनी देशपांडे यांनी मराठीसह हिंदीतील अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अनेक सिनेमांमधून सुहासिनी यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्या रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम या सिनेमातही दिसल्या होत्या. आता त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झाल्याची भावना आहे.

सुहासिनी देशपांडे यांचा सिनेसप्रवास...

सुनासिनी देशपांडे मनाचा कुंकू (1981), कथा (1983), आज झाले मुक्त मी (1986), आई शप्पथ...! (2006), चिरंजीव (2016), धोंडी (2017) या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याचप्रमाणे सिंघम या सिनेमातही त्या झळकल्या होत्या. कथा अकलेच्या कांद्याची, राजकारण गेलं चुलीत आणि सासुबाईंचं असंच असतं नाटकांमधूनही त्या रंगभूमीवर दिसल्या होत्या. त्यांच्या रंगभूमीवरील योगदानासाठी आणि कार्याबद्दल सुहासिनी देशपांडे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने 2015 साली सन्मानित करण्यात आलं.

 दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 28-08-2024

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow