गुहागर आगाराला आठ वर्षांत एकही नवीन एसटी बस नाही

Aug 29, 2024 - 11:04
 0
गुहागर आगाराला आठ वर्षांत एकही नवीन  एसटी  बस नाही

गुहागर : दररोज २६ हजार कि. मी. अंतराचे उद्दिष्ट असलेल्या गुहागर आगाराला गेल्या आठ वर्षात एकही नवीन बस एस. टी. महामंडळाने दिलेली नाही. आगारात असलेल्या एकूण ६२ गाड्यापैकी ७ गाड्या १४ वर्षापूर्वीच्या असून, पुढील वर्षी त्या वापरास अयोग्य होणार आहेत.

याबाबत आगारप्रमुख सोनाली कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगारात एकूण ६२ गाड्या आहेत. २४२ चालक-वाहक कर्मचाऱ्यांमार्फत दररोजचे १९ हजार कि.मी.चे उद्दिष्ट पूर्ण केले जाते. मात्र गुहागरला दररोजचे २६ हजार कि.मी. चे उद्दीष्ट आहे. यामुळे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एकूण ८० गाडयांची आवश्यकता आहे. आगारास अजून १८ गाडयांची आवश्यकता आहे तर मंजूर ४२६ कर्मचाऱ्यांमध्ये अजूनही २२४ चालक वाहक कर्मचाऱ्यांची गरज आहे. गुहागरसाठी एक विठाई व बीएसफोरच्या ४ गाड्या आल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आज आगारातील ७ मीटर लांबीच्या गाड्यांची दुरवस्था असून, तालुक्यात २० फेऱ्यांकरिता ७ मीटर लांबीच्या चार गाडयांची मागणी जिल्हा पातळीवर करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 29/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow