नवीन मडगाव - बांद्रा एक्स्प्रेसला खेड स्थानकावर थांबा द्या; शिवसेनेची मागणी

Aug 29, 2024 - 11:26
 0
नवीन मडगाव - बांद्रा एक्स्प्रेसला खेड स्थानकावर थांबा द्या; शिवसेनेची मागणी

खेड : कोकण रेल्वे मार्गावरून दि. २९ पासून धावणाऱ्या नवीन मडगाव - बांद्रा एक्स्प्रेसला खेडमध्ये थांबा द्या, अशी मागणी तालुका व शहर शिवसेना यांच्या वतीने खेड रेल्वे स्टेशन मध्ये बुधवारी दि. २८ रोजी निवेदन देऊन करण्यात आली आहे. यावेळी निवेदनाचा स्वीकार स्टेशनमास्तर रफिक नांदगावकर यांनी केला व वरिष्ठांकडे निवेदन पाठवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

कोकण रेल्वे मार्गावरून १०११६/१०११५ या क्रमांकाची एक्सप्रेस गाडी बांद्रा ते मडगाव या टप्प्यात धावणार आहे. तिला खेड येथे थांबा मिळाल्यास खंड, दापोली, मंडणगड येथील जे हजारो प्रवासी बोरिवली, कांदिवली, दहिसर, विरार, वसई या ठिकाणी ये जा करतात त्यांना सोईस्कर होणार आहे. ही गाडी खेड येते थांबवण्यात यावी अन्यथा खेड शिवसेनेला आंदोलन करावे लागेल, असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देण्यासाठी माजी सभापती अरुण कदम, तालुका प्रमुख सचिन धाडवे, शहर संघटक रंगा शेठ माने, सतीश ऊर्फ पप्पू चिकणे, मिनार चिखले, युवासेना प्रमुख मिलिंद काते, प्रेमळ चिखले, तुषार सापते, श्रीकांत शिर्के, साहिल मोरे, सौरभ राणीम, रूपेश कदम, राज यादव, बाळू पास्टे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 29-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow