ब्रेकिंग : Baramati Constituency Lok Sabha Election Result: नणंद-भावजयीच्या हाय व्होल्टेज लढतीत सुप्रिया सुळे विजयी; बारामतीत अजित पवारांना धक्का

Jun 4, 2024 - 15:47
Jun 4, 2024 - 15:49
 0
ब्रेकिंग : Baramati Constituency Lok Sabha Election Result: नणंद-भावजयीच्या हाय व्होल्टेज लढतीत सुप्रिया सुळे विजयी; बारामतीत अजित पवारांना धक्का

पुणे जिल्ह्यातील नवीन तर देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात दुरंगी लढत झाली. पवार कुटुंबातील ही लढत चुरशीची झाली नाही. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे एक लाखावरुन अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.

अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत झाल्या आहेत. महायुतीमध्ये अजित पवार यांचा पक्ष केवळ एका जागेवरच विजय मिळणार आहे.

सकाळी सुनेत्रा पवार यांनी घेतली होती आघाडी

सकाळी ९ वाजता सुनेत्रा पवार दहा हजार मतांनी आघाडीवर गेल्या आहेत. बारामतीमध्ये पोस्टल मतमोजणीस सुरुवात झाली आहे. त्यात सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे. त्या सकाळी १०.३० पर्यंत १९ हजार मतांनी पुढे होत्या. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे.

बारामतीच्या लढतीकडे देशाचे लक्ष

पवार कुटुंबामध्ये झालेल्या या लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे (supriya sule maha vikas aghadi) तर महायुतीकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar Mahayuti) निवडणूक रिंगणात होत्या. नणंद-भावजय यांच्या या लढतीत प्रचार दरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. बारामती लोकसभा मतदार संघासाठी 7 मे रोजी मतदान झाले होते. बारामतीमध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

बारामती लोकसभा मतदार संघाचा इतिहास 

बारामती लोकसभा मतदारसंघाकडे यंदा देशाचे लक्ष होते. आतापर्यंत पवार कुटुंबियांचे वर्चस्व या मतदार संघावर राहिले. 1984 साली शरद पवार यांनी भारतीय काँग्रेस (समाजवादी) पक्षाकडून पहिल्यांदा येथून निवडणूक जिंकली. यापूर्वी या जागेवर काँग्रेसचे वर्चस्व होते. शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून 6 वेळा, त्यांची कन्या सुप्रिया सुळे 3 वेळा आणि त्यांचे पुतणे अजित पवार एकदा खासदार झाले आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला यांचा समावेश आहे. 2019 च्या निवडणुकीत या जागेवर 21,14,716 मतदार होते. 1957 मध्ये येथे पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे केशवराव जेधे विजयी झाले होते. 1960 च्या पोटनिवडणुकीत आणि 1967 च्या निवडणुकीत काँग्रेसचे गुलाबराव जेधे खासदार म्हणून निवडून आले. 1971 च्या निवडणुकीत काँग्रेसचे आर.के.खाडीलकर तर 1977 मध्ये जनता पक्षाचे संभाजीराव काकडे विजयी झाले. 1980 मध्ये काँग्रेसने पुन्हा ही जागा काबीज केली आणि शंकरराव बाजीराव पाटील खासदार झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:17 04-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow