'आरजूच्या' सात संचालकांवर कुडाळात गुन्हा दाखल

Jun 4, 2024 - 15:34
Jun 4, 2024 - 15:37
 0
'आरजूच्या'  सात संचालकांवर कुडाळात गुन्हा  दाखल

कुडाळ : रत्नागिरी-मिरजोळे येथील आरजू टेकसोल कंपनीचे संचालक तसेच त्यांचे प्रतिनिधी व स्टाफने एकमेकांच्या संगनमताने व्यवसाय इच्छिणाऱ्यांना करू 'रोजगाराची सुवर्णसंधी' अशी फसवी जाहिरात करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असलेल्या १३९ ग्राहकांची फसवणूक केली. याप्रकरणी कंपनीच्या सातजणांवर कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची फिर्याद राजश्री रघुनाथ साधले (रा. कसाल) यांनी कुडाळ पोलिसांत दिली आहे.

याप्रकरणी आरजू टेकसोल प्रा. लि. या कंपनीचे संचालक प्रसाद शशिकांत फडके, 'आरजू' कंपनीच्या सात संचालकांवर कुडाळात गुन्हा  संजय विश्वनाथ सावंत, संजय गोविद केळकर, अमर महादेव जाधव, असिस्टंट एक्झिक्युटीव्ह श्रीम. सायली सरफरे, जनरल मॅनेजर मुझफ्फर इब्राहीम अलसुलकर, अकाऊंट हेड अमोल पाटील (सर्व रा. रत्नागिरी) यांच्या विरुध्द कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोव्हेंबर २०२३ मध्ये आरजू टेकसोल कंपनीची साधले यांनी जाहिरात वाचली, त्यामध्ये कंपनीच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पादने तयार करण्यासाठी व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना रोजगाराची सुवर्णसंधी अशी जाहिरात व त्याखाली एलईडी बल्ब बनवण्याचे काम प्लोटींग कॅण्डल बनविण्याचे काम, धूप बनवण्याचे काम, अगरबत्ती बनविण्याचे काम, मॉप बनविण्याचे काम, टीशर्ट प्रीिटिंग करण्याचे काम, चप्पल बनविण्याचे काम, वायपर बनविण्याचे काम, नोन वुवन बॅग बनवण्याचे काम अशी कामे नमूद करण्यात आली होती. त्याखाली जॉब वर्क पध्दतीने काम घ्या. आम्हाला प्रोडक्ट तयार करून द्या, मशिनरी आम्ही देणार, कच्चा माल आम्ही देणार, तयार करून तुम्ही देणार, असे नमूद करण्यात आले होते. श्रीम. साधले यांना स्वतःचा धूप बनविण्याचा व्यवसाय सुरू करावयाचा असल्याने त्यांनी नोव्हेंबर २०२३ महिन्यात कंपनीच्या कुडाळ येथील कार्यालयात येऊन माहिती घेतली होती. त्यावेळी त्यांना कंपनीचे स्टाफ श्रीम. निकिता धुरी व श्री. सावंत यांच्याकडून व्यवसाय व कंपनीच्या कामकाजाबाबत माहिती घेतली. त्यांनी श्रीम. साधले यांना आपली कंपनी शासन रजिस्टर असल्याचेही सांगितले होते. त्यावेळी कंपनीच्या स्टाफने श्रीम. साधले यांना धूप बनवण्यासाठी ३ लाख ५० हजार रुपये डिपॉझीट अॅडव्हान्स भरावे लागेल असे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:00 PM 04/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow