गणेशोत्सवात यंदा ओवसा पारंपारिक विधी साजरा होणार

Aug 29, 2024 - 17:25
Aug 29, 2024 - 17:27
 0
गणेशोत्सवात यंदा ओवसा पारंपारिक विधी साजरा होणार

रत्नागिरी : यावर्षीच्या गणेशोत्सवातील गौरी पूर्वा नक्षत्रात येणार असल्याने नवीन लग्न झालेल्या सुवासिनीसाठी ओवसा हा पारंपरिक विधी साजरा होणार आहे. 

परिणामी, यासाठी आवश्यक असमान्त्या सुमांच्या खरेदी-विक्रीला जोर चढला असून एक ओवसा, सुपांचा संच १२०० ते १३०० रुपयांना विकला जात आहे. 

या प्रथेसाठी बांबूच्या बिळशांपासून वळलेली ५ सुपे आवश्यक असतात. यातील ३ सुपं मोठी तर २ छोटी असतात. नवीन लग्न झालेल्या सुवासिनीने लग्नानंतर पहिल्या पूर्वा नक्षत्रात ओवसा साजरा करायचा असतो. यासाठी ५ सुपांमध्ये विविध प्रकारची फळे, सौभाग्याच लेणं, तांदूळ, ओटी आदी विविध प्रकारचे पूजासाहित्य मांडून ही सुपं गौरीसमोर ठेवून त्याचे मनोभावे पूजन करायचे आणि गौरीला नैवेद्य दाखवायचा याचे पूजन झाल्यावर सर्वांनी या सुपांचे दर्शन घ्यायचे, असा प्रघात आहे. लग्नानतर पहिल्याच वर्षी गौरी पूर्वा नक्षत्रात आल्यास हा सण साजरा होतो. ओवसा या प्रकारासाठी लागणारी बांबूची सुप वळप करून घट्ट विणीने तयार करणारे कारागिर फारच कमी झाले आहेत.

नव्या पिढीमध्ये याबाबत फारशी आवड नसल्याने आजही वयोवृद्ध मंडळीच हे काम करताना दिसतात. हा प्रकार म्हणजे वळप कारागिरांसाठी हक्काचा रोजगार आहे. हे काम खूप कठीण आणि वेळकाढू असते. ज्यावर्षी गौरीचे आगमन पूर्वा नक्षत्राला होते त्याच वर्षी या सुपांची मागणी वाढते आणि यातून कारागिरांना चांगला व्यवसाय मिळतो.
 
यावर्षीच्या गणेशोत्सवातील गौरीही पूर्वा नक्षत्रालाच येत असल्याने यावर्षीच लग्न झालेल्या सुवासिनींचा ओवसा साजरा होणार आहे. यासाठी आतापासूनच बाजारपेठेत ओवशाच्या सुपांची जोरात विक्री सुरू असून सध्या ५ सुपांच्या एका ओवशाची विक्री १२०० ते १३०० रुपयांना सुरू आहे.

दिवसेंदिवस वळप कारागिरांची कमी होत आहे. नवीन पिट्टी शिक्षणाचा प्रवाहातून नोकरी व्यवसायाकडे वळल्याने सुपं-रोवळ्या तयार करणाऱ्या कारागिरांची संख्या घटू लागती आहे. वलय काम करणे हे कौशल्याचे काम आहे. यासाठी वेळदेखील अधिक लागतो. एवढा वेळ देऊन काम करण्याचा संयम नव्या पिढीकडे नसल्याने हे काम शिकण्याकडे त्यांचा कल दिसून येत नाही, परिणामी, जुन्या वळप कारागिरांकडूनच सुपं-रोवळ्या, परड्या तयार करण्याचे काम केले जात आहे. - अनिता जाधव, वळप कारागीर, शिवने.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:55 29-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow