कोकण किनारा गोविंदा पथक घासकोरी शनिमंदिर विरार पूर्व यांचा 2024 मध्ये 6 थरांचा यशस्वी थरार

Aug 30, 2024 - 09:40
Aug 30, 2024 - 09:41
 0
कोकण किनारा गोविंदा पथक घासकोरी शनिमंदिर विरार पूर्व यांचा 2024 मध्ये 6 थरांचा यशस्वी थरार

◼️ जगात एक नंबर.... आपले कोकण लय सुंदर......

रत्नागिरी : दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी 'आम्ही कोकणकर' गुहागर मधील मुलांनी एकत्र येऊन सुरू केलेलं कोकण किनारा गोविंदा पथक घासकोपरी शनि मंदिर विरार नगरीत वर्ष ३ रे साजरे करत क्रिकेट च्या माध्यमातून निर्माण झालेली ओळख मैत्री, ऋणानुबंध कायम ठेवत ( माय भुमी हौशी भजन मंडळ- वारकरी संप्रदाय ) आणि (कोकण किनारा गोविंदा पथक) याची संकल्पना अवलंबली कोकणातली आपली परंपरा जपली पाहिजे, विरार मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहायला अनेक गावांतील सर्व मुलांना एकत्र करण्याचा एकच हेतू  म्हणजे आमच्या पाठीमागे मंडळ नाही कोणताही राजकीय पक्ष नाही स्वतः मुलं खंबीर पणे एकमेकांच्या मागे उभी राहवून एकमेकांना अडअडचणीच्या वेळेस धावून यावीत म्हणून आम्ही एकत्र येण्याचा पर्याय निवडला यशस्वी होत आहे.

हि संकल्पना साकारण्यासाठी प्रयत्न सुशांत जोशी, महेश येद्रे, प्रशांत जोशी, संदेश पाडदळे, रोहित घाणेकर, अभिषेक वाघे, प्रभु धावडे, हेमंत खांडेकर, Dj सचिन कुळये, कल्पेश खेराडे, सुरज कांबळे, (कोच ) सचिन मळेकर इत्यादी. सोबत अनेक गावांतील मुलांनी एकत्र येऊन सुरु केला. कोकण किनारा गोविंदा पथक नाव देण्यात आले. या गोविंदा पथकाने १ महिने रोज सराव करून ५ थरांची सलामी १४ ठिकाणी दिली. ३ ठिकाणी ६ थरांचा थरार यशस्वी झाला आणि गोल फिरता मोनोरा मानवंदना दिली,तिसरा थरावर व्यायाम बैठक ५ वेळा मारण्यात आला अशी आगळी वेगळी "संकल्पना" वरचा छोटा गोविंदा रूद्र मळेकर, अर्णव पिंपर गाव गुहागर चा  आयोजकांची मने जिंकली भर पावसाची जोरदार संततधार सुरू असताना हि थरावर थर रचत होते.

हे सर्व कोकण वाशीय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील गुहागर तालुक्या गाव मधिल मुले गाव तवसाळ तांबडवाडी‌‌  शिवणे गाव,दोडवली, सडे जांभारी, पालशेत - मांडवकर वाडी,वाडदई, चिंद्रावले, पिंपर, मार्गताम्हाणे, चिपळूण -तनाली गाव, दापोली-दलखनवाडी रत्नागिरी कोतवडे, खेड-जैतापुर, राजापूर आडिवरे, देवगड-गिरजे माजगाव,  राजापूर देवीहसोळ, आबाये गाव, पारवाडी, मंडणगड तालुका पन्हाळी बुद्रुक गाव, रायगड - पोलादपूर गाव तुर्रबे खुर्द, तालुका कुडाळ- गाव-कुपावडे, गुजरात पालगापुर- नेनपर गाव,अशी अनेक कोकणातली मुलं सहभागी होऊन विरार नालासोपारा, वसई अशा  ठिकाणी सलामी देऊन एक हंडी फोडण्याचा मान मिळाला एकुण ९ सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. 

सोबत सोशल मीडिया प्रसार माध्यम Dj श्री सचिन कुळये तवसाळ तांबडवाडी, गुहागर) यांच्या माध्यमातून फोटो, video मोबाईल कॅमेरा) मधुन नेत्रदीपक क्षण सर्वांन पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आयोजक, उपस्थित गोविंदा, बाल गोपाळ, महिला वर्ग यांचे कोकण किनारा गोविंदा पथक वतीने आभार आणि धन्यवाद देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 30-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow