संगमेश्वर : वांद्री येथे हातभट्टीवर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी : वांद्री (ता. संगमेश्वर) गिराचा पऱ्या येथील झाडझुडपाच्या आडोशाला हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या संशयितावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ९५० रुपयांची ९ लिटर दारू जप्त केली. संगमेश्वर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन शंकर कीर (रा. वांद्री, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २८) निदर्शनास आली. संशयित विनापरवाना हातभट्टीची ९५० रुपयांची ९ लिटर दारु विक्रीसाठी ठेवलेल्या स्थितीत पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिस कॉन्स्टेबल राहुल खरपे यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 30/Aug/2024
What's Your Reaction?