लांजा शहरात प्रथमच यंदा सार्वजनिक गणेशोत्सव

Aug 30, 2024 - 14:07
 0
लांजा शहरात प्रथमच यंदा सार्वजनिक गणेशोत्सव

लांजा : यंदा गणेशोत्सवापासून लांजा शहरात प्रथमच लांज्याचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे शहरातील गणेशभक्तांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. 

मुंबई, पुणे यासारख्या शहरांत सार्वजनिक गणेशोत्सवाची धूम असते. लांजा तालुक्याच्या काही गावांमध्येदेखील सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात; मात्र लांजा शहरात अशा प्रकारे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात नव्हता. लांजा येथील बाबू वाघधरे यांनी यावर्षीपासून प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, लांज्याचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव या वर्षापासून त्यांच्या पुढाकाराने सुरू होणार आहे. लांजा शहरातील श्रीराम मंदिराजवळ असलेल्या ठिकाणी हा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:34 30-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow