गुहागर : बिबट्याच्या बछड्याला हाताळल्याप्रकरणी वन विभागाकडून संबंधितांना नोटीस

Aug 31, 2024 - 12:03
 0
गुहागर : बिबट्याच्या बछड्याला हाताळल्याप्रकरणी वन विभागाकडून संबंधितांना नोटीस

चिपळूण : गुहागर तालुक्यातील उमराठ येथे प्राथमिक शाळेत बिबट्याच्या बछड्याला खेळवितानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. अखेर या व्हिडीओचे सत्य समोर आले आहे. हा बिबट्याचा बछडा दोन ते तीन महिन्यांपूर्वी येथील ग्रामस्थाला सापडला होता आणि त्याच्या मुलांनी शाळेत तो दाखविण्यास आणला होता, असे समोर आले आहे. अखेर वन विभागाने या प्रकरणी संबंधितांना नोटीस बजावली आहे.

बिबट्याचा बछडा जेथे असतो त्याच्या आसपास बिबट्याची मादीदेखील असते. त्यामुळे त्या बछड्याला हाताळणे किंवा जवळ जाणे जीवाला धोकादायक असते. शिवाय त्या पिल्लाचा शोध मादी घेत असते. अशाही परिस्थितीत हा बिबट्याचा बछडा शाळेत पोहोचला, विद्यार्थ्यांनी त्याला हाताळला. त्यामुळे अशी धोकादायक परिस्थिती असताना संबंधित शिक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले नाही.

वास्तविक याबाबत तत्काळ वन विभागाला कळविणे गरजेचे होते. अखेर ही घटना ज्यावेळी वन विभागाला समजाल्यावर वन विभागाने तत्काळ बछड्याला ताब्यात घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 31/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow