रत्नागिरी : मानधन तत्वावरील शिक्षकांचे सलग आठव्या दिवशी उपोषण सुरूच

Aug 23, 2024 - 09:58
 0
रत्नागिरी : मानधन तत्वावरील शिक्षकांचे सलग आठव्या दिवशी उपोषण सुरूच

रत्नागिरी : मानधन तत्वावरील शिक्षकांना शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती मिळण्यासंदर्भात स्वातंत्र्यदिनापासून शिक्षकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गुरुवारी अख्या दिवशीही हे उपोषण सुरुच असून प्रशासनाकडून कंत्राटी शिक्षकांबाबत ठोस भूमिका घेतली जात नसल्याने उपोषणकर्त्या महिलांकडून आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बसलेल्या उपोषणकरांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, बीएड, पदवीधर बेरोजगार सन २०२३-२४ या शैक्षणिक अर्थात मानधन तत्वावरील कंत्राटी शिक्षक या पदावर कार्यरत होतो. ३० एप्रिल रोजी जिल्हा परिषदेने आम्हाला कार्यमुक्त केले आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील जवळजवळ साडेसातशे शिक्षकांची आंतर जिल्हा बदली झाल्याने रत्नागिरी जिह्यातील शेखडो प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला होता. जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती पाहून या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्थानिक डीएड, बीएड, पदवीधर बेरोजगार यांना साद घातली आणि आम्ही शिक्षण व्यवस्थेला मोडकळीस येण्यापासून वाचविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु, मंत्री सामंतांनी ज्यांना साद घातली त्या कंत्राटी शिक्षकांची व्यथा जाणून घेण्याबाबत पालकमंत्री दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुन्हा संधी मिळण्याची मागणी
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्थानिक डीएड, बीएड, पदवीधर बेरोजगार भूमिपुत्रांना शिक्षण सेवक म्हणून सेवा बजावण्याची पुनःश्च संधी मिळावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा मानधन तत्वावरील शिक्षक संयोजक सुदर्शन मोहिते यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 23/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow