चिपळूण : कापशी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार : शाहनवाज शाह

Aug 31, 2024 - 11:41
Aug 31, 2024 - 14:45
 0
चिपळूण : कापशी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार : शाहनवाज शाह

चिपळूण : तालुक्यातील सावर्डे येथील कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्याविरोधात सावर्डे परिसरातील सात गावांच्या ग्रामस्थांचे १५ ऑगस्टपासून येथील प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. पंधरा दिवसांनंतरही यावर तोडगा निघालेला नाही. या उपोषणाची जलदूत, वाशिष्ठी जगबुडी नदी समन्वयक शाहनवाज शाह यांनी दखल घेत शुक्रवारी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली.

तसेच कापशी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी आपणही शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले, सावर्डे येथील कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे कापशी नदी प्रदूषित होत आहे. याचा फटका सावर्डेसह, कोंडमळा, आगवे, दहिवली, ओमळी, बोक्रवली, मांडकी गावांतील ग्रामस्थांना बसत आहे. या विरोधात येथील ग्रामस्थांनी दूषित पाण्याच्या प्रश्नावरून स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने साखळी उपोषण सुरू केले. त्यानंतर आजतागायत हे उपोषण सुरूच आहे. आतापर्यंत या उपोषणकर्त्यांचे आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, रमेश कदम, प्रशांत यादव, तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतरही उपोषणावर कोणताही तोडगा निघाला नाही. ग्रामस्थांनी उपोषण यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. जोवर न्याय मिळत नाही तोवर उपोषण सुरूच राहील, असे या उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 31/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow