पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहाचे सोमवारी उद्घाटन

Jul 13, 2024 - 09:49
 0
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहाचे सोमवारी उद्घाटन
रत्नागिरी :  जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकसभा सदस्य खासदार सुनिल तटकरे, खासदार नारायण राणे, विधान परिषद सदस्य आमदार प्रसाद लाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार ॲड निरंजन डावखरे, विधानसभा सदस्य आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार डॉ. राजन साळवी, आमदार योगेश कदम उपस्थितीत असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
      
कोकण विभागीय आयुक्त पी वेलरासू, पालक सचिव सीमा व्यास तसेच जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. उद्घाटन समारंभानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक नूतन सभागृहात होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 13-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow