खेड : कशेडी बोगद्यात दुचाकीचा अपघात; स्वार गंभीर जखमी

Sep 2, 2024 - 10:51
Sep 2, 2024 - 10:54
 0
खेड : कशेडी बोगद्यात दुचाकीचा अपघात; स्वार गंभीर जखमी

खेड : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी चालक भानुदास लक्ष्मण कारभळ (वय. ६५ रा. बीएसएनएल ऑफिस शेजारी, खेड) हे आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन कापूरघोळ ते खेड असे जात असताना कशेडी घाटातील बोगद्यात आले असता. बोगद्यात असलेल्या चिखलामुळे दुचाकी घसरून अपघात झाला. यात भानुदासचे डोके बोगद्यातील कठड्यावर आदळले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघाताची माहिती समजतात कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समेल सुर्वे, सहाय्यक फौजदार सचिन सावंत, पोलीस हवालदार शंकर कुंभार, गजानन रामागडे, संजय चिकणे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी दुचाकी स्वारास पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्यांना अधिक उपचारासाठी डेरवण येथे वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 02/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow