दापोली : वाकवलीत रिक्षाच्या धडकेत बिबट्याचा बछडा जखमी

Sep 2, 2024 - 10:59
 0
दापोली : वाकवलीत  रिक्षाच्या धडकेत बिबट्याचा बछडा जखमी

दापोली : येथील वाकवली येथे रिक्षाची धडक लागून बिबट्याचा बछडा जखमी झाला. त्याला उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आल्याची माहिती दापोली वनविभाग अधिकाऱ्यांनी दिली.

शुक्रवारी (ता. ३० ऑगस्ट) रात्री दहाच्या सुमारास वाकवली वसतिगृह येथे गिरीधर येलकर यांच्या रिक्षा टेम्पोच्या धडकेने बिबट्याचा बछडा जखमी झाला आहे. त्यानंतर बछडा जागीच बसून असल्याची माहिती वाईल्ड अॅनिमल रेस्क्यू टीमचे मिलिंद गोरिवले यांनी दिली.

तत्काळ वाईल्ड अॅनिमल रेस्क्यू टीमने पाहणी केली असता बछडा जखमी अवस्थेत रस्त्याच्या बाजूला बसल्याचे दिसले. परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील यांच्या सहकार्यातून त्याला ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले. पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले. परिक्षेत्र वनाधिकारी पाटील, वनपाल सावंत, वनरक्षक जळणे, वनरक्षक जगताप, वनरक्षक गुरव, वनरक्षक भिलारे व वाइल्ड अॅनिमल रेस्क्यू टीमचे तुषार महाडिक, मिलिंद गोरिवले, मयूर चव्हाण, अनिकेत जाधव यांनी यासाठी मदत केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 02/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow