देवरूखामध्ये रुग्णवाहिका चालकांच्या इमारतीला गळती

Aug 7, 2024 - 11:21
 0
देवरूखामध्ये रुग्णवाहिका चालकांच्या इमारतीला गळती

देवरूख : देवरूख ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिका चालकांचे वास्तव्य असलेल्या इमारतीला गळती, अक्षरशः दुर्दशा झाली असून पत्र्याचे छप्पर मोडलेल्या अवस्थेत आहे. इमारतीला गळती लागल्याने छताला प्लास्टिक कागदाचा आधार, ठिबकणारे पाण्यासाठी बादल्या लावण्यात आल्या आहेत.

देवरूखसाठी २ रुग्णवाहिका असून १ चालक २४ तास सेवा बजावत आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी चालकाची अहोरात्र धडपड सुरू असताना २४ तास सेवा बजावूनही त्याला गळक्या इमारतीत राहावे लागत आहे. पाण्याचा अभिषेक आणि मच्छरांचा चावा याचा सामना करत चालकाला वास्तव्य करावे लागत आहे.

चालकांची इतर ठिकाणी व्यवस्था करणे गरजेचे असून, त्याचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. रुग्णालयाच्या नूतन इमारत उद्घाटनाला अजूनही मुहूर्त मिळत नसल्याने या अडचणी निर्माण होत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 07/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow