रत्नागिरी : शिवसृष्टी तोडफोड प्रकरणात एकजण ताब्यात
रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर शिवसृष्टी येथील मावळ्यांच्या पुतळ्यांची तोडफोड प्रकरणी शहर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दारूच्या नशेत रात्रीच्या सुमारास त्याने हे कृत्य केले असे समजत आहे. सकाळी हि घटना उघडकीस येताच शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, दीपक पवार, अभी दुड्ये यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. आता रत्नागिरी नगरपालिकेने पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 02-09-2024
What's Your Reaction?