उन्हाळ्यात शेतजमीन पडीक ठेवू नका : मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार

Jul 2, 2024 - 16:43
Jul 2, 2024 - 16:49
 0
उन्हाळ्यात  शेतजमीन पडीक ठेवू नका :  मुख्य कार्यकारी अधिकारी  कीर्तिकिरण पुजार

रत्नागिरी : कोकण हा कातळ, डोंगरी भागाचा प्रदेश आहे. जसा इथला शेतकरी पावसाळ्यात भात, नाचणी पीक घेतो, त्याच पद्धतीने उन्हाळ्यातही शेतजमीन पडीक न ठेवता विशेषतः भाजीपाला उत्पादनावर त्याने भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी केले.

कृषी दिनानिमित्त करबुडे ग्रामपंचायतीमध्ये आज प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामदैवत मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर माध्यमिक विद्यालय, करबुडे-लाजूळच्या राष्ट्रीय हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली. ग्रामपंचायत येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांने कृषी दिनानिमित्ताने एक वृक्ष लावावा, निसगनि कोकणाला भरभरून दिले आहे. येथील नैसर्गिक साधनसामुग्रीचे संवर्धन करणे आणि जतन करणे, ही आपली जबाबदारी आहे. भविष्यात कोणत्याही क्षेत्रात प्रगती करत असताना जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडा. शासनाच्या विविध विभागांमार्फत अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनेचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा. विशेषतः कृषी विभागाच्या माध्यमातून महिला शेतकरी उत्पादक निर्माण व्हावे, कृषी हा खूप मोठा विषय आहे. कोकण हा कातळ, डोंगरी भाग आहे. जसा इथला शेतकरी पावसाळ्यात भात, नाचणी पीक घेतो, त्याच पद्धतीने उन्हाळ्यातदेखील शेतजमीन पडीक न ठेवता विशेषतः भाजीपाला उत्पादनावर भर दिला पाहिजे. शेतीमधील नवनवीन प्रवास करण्यासाठी आजच्या कालावधीत माहिती घ्यायला कोणतीही कमतरता नाही, ती सर्वत्र उपलब्ध आहे. करबुडे ग्रामपंचायतीने स्वत:पासून असे नवनवीन प्रयोग करावेत. त्यासाठी योक्नांची १०० टक्के अंमलबजावणी करावी.

प्रास्ताविकात गटविकास अधिकारी जाधव यांनी शेतकऱ्याने निश्चित शेतीमध्ये बदल करावेत. बाजारातील मागणीनुसार लागवड करावी. विकसित शेतकरी, विकसित खेडे निर्माण करण्याची संधी सोडू नये, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच संस्कृती पाचकुडे, उपसरपंच करिष्मा गोताड़, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आलिंदर पांगरे, कृषी विकास अधिकारी अजय शेंडे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:10 PM 02/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow