तर उदय बनेंवर निश्चित कारवाई होणार...?
रत्नागिरी : शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब ज्याला उमेदवारी देतील तोच विधानसभेचा उमेदवार. यापेक्षा वेगळी भूमिका मांडण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होणार. उमेदवारी मिळवण्यासाठी प्रसिद्धी माध्यमातून भूमिका जाहीर करण्याची शिवसेनेत पद्धत नाही. शिवसेना हा पक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर चालणारा पक्ष आहे. मागील दोन वर्षापासून ज्येष्ठ शिवसैनिक उदय बने हे इच्छुक असल्याचे ऐकिवात आहे. मात्र शिवसेनेत अल्टीमेटम देऊन चालत नाही. उदय बने हे शिवसेनेत अनेक वर्ष काम करतात त्यांना पक्षशिस्त काय असते हे चांगले माहित आहे, असा इशारा रत्नागिरी शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी दिला आहे.
रत्नागिरीतील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदय बने यांनी पक्षाला दिलेल्या अल्टीमेटम नंतर आता शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांचे वक्तव्य समोर आले आहे. उदय बने आणि आपल्या वाढदिवसा प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना आपल्या विधानसभा उमेदवारी बाबत भाष्य केले होते. 31 जुलै पर्यंत पक्षाने माझ्या उमेदवारीचा विचार न केल्यास कार्यकर्त्यांशी बोलून मी माझी पुढील दिशा ठरवेन असा इशारा उदय बने यांनी दिला होता. यानंतर शिवसैनिकांमधून देखील अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता उदय बने यांच्या विधानावर शिवसेना पक्षाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांना प्रसार माध्यमानी याबाबत विचारले असता त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एकंदर विलास चाळके यांनी उदय बने यांना आपल्या वक्तव्यातून पक्ष शिस्तीचा डोस दिला आहे.
What's Your Reaction?