चिपळूण बसस्थानकाचे काम होणार मार्चअखेर पूर्ण

Sep 2, 2024 - 14:07
 0
चिपळूण बसस्थानकाचे काम  होणार  मार्चअखेर पूर्ण

चिपळूण : गेली अनेक वर्षे मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. आता काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे. या उत्सवात आगारांमध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमानी यांची गर्दी होते, काम अपूर्ण असल्यामुळे बसेस उभ्या करायला जागासुद्धा मिळत नाही. या कामासंदर्भात आगारप्रमुख दीपक चव्हाण यांना आमसभेमध्ये विचारले असता त्यांनी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम येणाऱ्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती दिली.

जिल्ह्यातील चिपळूण हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे प्रवाशांना चिपळूण मध्यवर्ती बस स्थानक हे प्रवास करण्यासाठी सोयीस्कर पडते. गेले अनेक वर्ष चिपळूण बसस्थानक हायटेक चिपळूण येथील बसस्थानकाचे सुरू असलेले काम. होणार अशी चर्चाच रंगते. हायटेक बसस्थानक बनवण्यासाठी जुनी इमारत पाडण्यात आली. मात्र, अनेक उन्हाळे, पावसाळे गेले तरीसुद्धा चिपळूण बसस्थानकाची इमारत अजूनही पूर्ण होत नाही. ज्या ठेकेदाऱ्यांनी पहिल्यांदा काम घेतले. त्याने काम अर्धवट सोडले. त्यानंतर दुसऱ्या ठेकेदाराने काम सुरू केले. हे काम पूर्ण होण्यासाठी प्रवाशांनी आणि काही राजकीय पुढाऱ्यांनीसुद्धा आंदोलने केली. पण त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. मधल्या काळात हे काम पुन्हा सुरू झाले. मात्र, पुन्हा एकदा या कामाला 'ब्रेक' लागला आहे. तो नेमका का लागला आहे? याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

बुधवार, दि. २८ ऑगस्ट रोजी आमसभा झाली. या सभेत भाजपाचे रामदास राणे यांनी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या संदर्भातील माहिती उपस्थित आमसभेला चिपळूण आगाराचे आगारप्रमुख दीपक चव्हाण यांना विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनी बसस्थानक येत्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. आम्ही सुद्धा या कामासंदर्भात पाठपुरावा करत आहोत. या संदर्भातील पत्रव्यवहारसुद्धा करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर बसेस उभ्या करण्यासाठी जागा अपुरी
चिपळूण बसस्थानकातील सध्याची स्थिती फार अवघड आहे. ग्रामीण आणि शहराकडे जाणाऱ्या बसेस लावण्यासाठी जागा अपुरी पडते. त्यामुळे प्रवाशांची सुद्धा धावपळ होते. कुठली एसटी कुठे नेमकी लागेल याचा ठावठिकाणा नसतो. त्यामुळे या आगाराचे बांधकाम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा प्रवासी करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 02/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow