विद्यार्थी विशेष गॅलरी कला प्रदर्शनामध्ये संगमेश्वरातील सागर जाधवची पाच निसर्गचित्रे

Sep 2, 2024 - 16:45
 0
विद्यार्थी विशेष  गॅलरी  कला प्रदर्शनामध्ये  संगमेश्वरातील सागर जाधवची पाच निसर्गचित्रे

देवरुख : विद्यार्थी विशेष-२०२४ या २६ व्या गॅलरी वार्षिक विद्यार्थी कला प्रदर्शनामध्ये संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी गावचा सुपुत्र सागर प्रदीप जाधव याच्या ५ निसर्गचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. तो सध्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि व्हिज्युअल आर्ट, सायन-मुंबई येथे बॅचलर इन फाईन आर्टमधील द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातून सागर याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करताना मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक संघाचे प्रतिनिधित्व केले. अभिनय आणि चित्रकला प्रकारांमध्ये राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात चमकदार कामगिरी केली होती. 

२६ व्या विद्यार्थी विशेष- २०२४ प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील ११ कला महाविद्यालयातील ३१ विद्यार्थ्यांच्या ११६ चित्रांचा समावेश असून, यामध्ये सागरची ५ निसर्गचित्रे निवडली गेली आहेत. सागरने या ५ निसर्गचित्रांमध्ये देवरुख परिसरातील ३ चित्रे, तर प्रत्येकी १-१ चित्र ग्रैंड रोड, मुंबई आणि पनवेल परिसरामध्ये चितारली आहेत.

याबद्दल त्याचे देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, कलाशिक्षक सूरज मोहिते, विलास रहाटे, प्रा. धनंजय दळवी तसेच देवरुख महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:13 PM 02/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow