निकालाचे चिंतन करून जनतेत जाऊ : देवेंद्र फडणवीस

Jun 5, 2024 - 10:48
 0
निकालाचे चिंतन करून जनतेत जाऊ : देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्रातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले.

पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊ या लोकसभेची कसर भरून काढू, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजप युतीला, तर ओडिशात भाजपच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले. या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते तर भाजप स्वबळावर ३१०च्या पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे मोदीजींना साथ दिली आहे. संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 05-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow