रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांवरील झाडांची छाटणी
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोठ्या झाडांच्या फाद्यांची छाटणी केली जात आहे. त्याचबरोबर रस्ता दुभाजकामधील रानटी झाडेही काढली जात आहेत.
रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला मोठमोठी झाडे असून त्यांच्या फांद्या रस्त्याच्या दिशेने वाढल्या आहेत. त्यामुळे एखादी फांदी तुटून दुर्घटना होऊ नये यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून या फांद्या तोडल्या जात आहेत.
शहरातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकामध्ये फुलझाडे लावण्यात आली आहेत. पावसाळ्यात या दुभाजकांमध्ये रानटी झाडे उगवली होती. ती रानटी झाडे काढून टाकण्याचे काम केले जात आहे. मोठ्या फांद्या तोडण्यासाठी जेसीबी आणि कटरचा वापर केला जात आहे. तोडलेल्या फांद्या तेथून लगेचच उचलल्या जात असून, वाहतुकीला कोणतीही अडचण होणार नाही याची काळजीही या कर्मचाऱ्यांकडून घेतली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 PM 03/Sep/2024
What's Your Reaction?