गोगटे महाविद्यालयात सायबर वॉरियर क्लबची स्थापना

Aug 31, 2024 - 10:55
 0
गोगटे महाविद्यालयात सायबर वॉरियर क्लबची स्थापना

रत्नागिरी : येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा क्विक हिल फाउंडेशनसोबत 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' जनजागृती करण्यासाठी सामंजस्य करार झाला असून त्याअंतर्गत सायबर वॉरियर क्लबची स्थापना करण्यात आली आहे.

या क्लबमध्ये १६ विद्यार्थ्यांची सायबर वॉरियर तसेच ४ क्लब ऑफिसर अशा २० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. क्लबचे उदघाटन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर आणि प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. केतन जोगळेकर यांनी केले.

प्रा. दुदगीकर यांनी विद्यार्थ्यांना सायबर जनजागृतीबद्दल सखोल मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. साखळकर यांनीही जनजागृती का महत्त्वाची आहे, यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी क्लब ऑफिसर आणि शिक्षक समन्वयक यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये पार्थ मुळ्ये - क्लब प्रेसिडेंट, वैष्णवी शिरसाट- क्लब सेक्रेटरी, कौशिक मुसळे- कम्युनिटी डायरेक्टर, वेदांग पाटणकर- पी.आर/मीडिया डायरेक्टर तसेच प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचा कोलॅबरेशन सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला.

निवड झालेले विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करतील. हे गुन्हे टाळण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबद्दलही मार्गदर्शन करतील. सायबर गुन्हा झाल्यास त्वरित १९३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करतील. वैयक्तिक आणि आर्थिक माहितीचे नुकसान होण्यापासून वाचवतील.

निवड झालेल्या झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्था आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 31-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow