गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याची मूर्तीकारांची लगबग..

Sep 5, 2024 - 16:44
Sep 5, 2024 - 16:43
 0
गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याची मूर्तीकारांची लगबग..

रत्नागिरी : साऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले असून, येत्या शनिवारी (ता.७) लाडक्या बाप्पांचे आगमन होणार आहे. गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याची कारगिरांची गडबड सुरू आहे. बाजारपेठेतही गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.

सार्वजनिक गणपतींची स्थापना करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली असून, त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अवघ्या दोन दिवसांवर उत्सव आल्याने मूर्तिशाळांमधील लगबग वाढली आहे. मूर्ती रंगवणे, त्यावर अखेरचा हात फिरवण्यामध्ये कारागीर मग्न आहेत. बाप्पांच्या स्वागतासाठी चाकरमानी कोकणात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आहे. जुलैपासून शेतीच्या कामांमुळे बाजारपेठेत मंदी होती. उत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असल्याने बाजारपेठेला नवसंजीवनी मिळाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:47 PM 05/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow