पाटगावमध्ये दुर्मिळ शॅमेलिऑन सरड्याचे दर्शन
देवरुख : नजीकच्या पाटगाव घाटीत पर्यावरणामित्र सुभाष पाटील यांना जातीच्या दुर्मिळ शॅमेलिऑन सरडयाचे दर्शन झाले. याच्या हालचाली पाटील यांनी कॅमेऱ्यात टिपल्या आहेत. शॅमेलिऑन सरडा ही अत्यंत दुर्मिळ जात असून, हा सरडा सहसा जमिनीवर उतरत नाही. त्याचे वास्तव्य झाड आणि वेलींवर आढळून येते. तो आपली तहानसुध्दा पानांवरील दवबिंदूतून भागवतो.
याच्या चारही पायांच्या पुढील भागांचे दोन पंजामध्ये रुपांतर झालेले असून त्याला साधारण चार नखे असतात बहुतेक वेळा शेपटीच्या टोकाकडील भागाचे जमिनिच्या दिशेने गोलाकार कड़े करतो याचे डोळे शंकूच्या आकाराचे असून, डोके शिरस्त्राण घातल्यासारखे दिसते. याची जीभ आठ ते नऊ इंच लांब असते. सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे हा आपल्या भोवतालच्या परिसरानुसार रंग बदलतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 03/Jul/2024
What's Your Reaction?