Ravindra Jadeja Joined BJP : रवींद्र जडेजाचा राजकारणात प्रवेश

Sep 5, 2024 - 16:12
Sep 5, 2024 - 16:13
 0
Ravindra Jadeja Joined BJP : रवींद्र जडेजाचा राजकारणात प्रवेश

पत्नी पाठोपाठ आता जड्डू देखील राजकीय खेळी करण्यासाठी सज्ज आहे. भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने राजकारणात प्रवेश केला आहे. तो भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला आहे.

जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ही गुजरातच्या जामनगरमधून भाजपची आमदार आहे. रिवाबाने नुकतीच जडेजाबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. तिने एका पोस्टद्वारे सांगितले की, रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. जडेजाने अलीकडेच २०२४ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

जड्डू अनेकदा पत्नी रिवाबासोबत निवडणुकीच्या प्रचारात दिसला आहे. त्यांनी अनेक रोड शो देखील केले आहेत. जडेजाची पत्नी रिवाबा जामनगर उत्तर मतदारसंघातून आमदार आहे. आता रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. रिवाबाने पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली की, रवींद्र जडेजा भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक सदस्य झाला आहे. खरे तर ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ नंतर रिवाबा आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

रिवाबा जडेजा ही भाजपच्या तिकिटावर विधानसभेला निवडून आली. ती जामनगर उत्तर येथून आमदार बनली. दरम्यान, ६ डिसेंबर १९८८ मध्ये रवींद्र जडेजाचा जन्म गुजरातच्या जामनगर येथील नवागाम गड सिटी येथील गुजराती राजपूत कुटुंबात झाला. रवींद्रने भारतीय सैन्यात जावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती, परंतु त्याने क्रिकेटपटू होण्याचा निर्णय घेतला. २००५ मध्ये रवींद्रची आई लता यांचा अपघातात मृत्यू झाला आणि त्यावेळी रवींद्रने क्रिकेट सोडण्याचा निर्णय जवळपास घेतला होता. २०१६ मध्ये रवींद्र आणि रिवाबा यांचे लग्न झाले. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव निध्याना असे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:41 05-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow