आज हरितालिका; पावसाच्या सरी झेलत बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी

Sep 6, 2024 - 09:42
Sep 6, 2024 - 09:50
 0
आज हरितालिका; पावसाच्या सरी झेलत बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी

रत्नागिरी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या गणपतीबाप्पांच्या आगमनासाठी आता काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यात पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्याने खरेदीत व्यत्यय येत आहे, परंतु भक्तांचा उत्साह तेवढाच वाढत असून, भरपावसातही खरेदीसाठी हजारो भक्त बाजारपेठेत पाहायला मिळत आहेत. आज (ता. ६) हरितालिका पूजन आहे व सायंकाळनंतर बाप्पांची स्वारी घरी निघणार असून, शनिवारी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. कोकणी माणूस उत्सवप्रिय असल्याने तो कर्ज काढूनही लाडक्या बाप्पांचा सण उत्साहात करतो. शहरातील रामआळी या मुख्य बाजारपेठेत दरवर्षीप्रमाणे गेले आठवडाभर भाविकांची विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. बाप्पासाठी लागणाऱ्या शेकडो प्रकारच्या फुले, मोत्यांच्या माळा, विविध फुलांचे हार, दागिने, सजावटीसाठी मखरे, रांगोळी, विद्युत रोषणाईसाठी तोरणे, कापूर, धूप, अगरबत्ती आणि पेढे व सर्व प्रकारच्या मेवामिठाईने बाजारपेठ सजली. रामआळी ही मुख्य बाजारपेठ असती तरी आता वाढत्या शहरीकरणामुळे मारूती मंदिर, साळवीस्टॉप, नाचणे आदी भागांतही गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य अनेक ठिकाणी उपलब्ध झाले आहे.

रंगकामाची लगबग
यंदा पाऊस थांबून थांबून कोसळत आहे. काही भागांत भरपूर बरसतो व काही ठिकाणी कमी आहे परंतु पाऊस समाधानकारक असल्याने व मध्येच उपडीप देत असल्याने चित्रशाळांमध्ये मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. रंगकाम पूर्ण करून बाप्पाची मूतों वेळेत भाविकांच्या हातो देण्यासाठी त्यांची कसरत सुरू आहे. रात्रीचा दिवस करत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मंडप सजावटाची कामे पूर्ण करण्याकडे भर देत आहेत. पोलिसही अनेक ठिकाणी विशेष लक्ष ठेवून आहेत. उत्सवकाळात बंदोबस्त व गस्तीथी कामे योग्यप्रकारे व्हावीत यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 06/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow