श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय देवूड येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

Sep 6, 2024 - 09:43
 0
श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय देवूड येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

रत्नागिरी : करजुवे पंचक्रोशी शिक्षण संस्था, करजुवेचे श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय देवूड येथे रविवार दिनांक ८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मेळाव्याला शाळेच्या सर्वच माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन करजुवे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्री नलावडे सर, श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय देवूडचे मुख्याध्यापक श्री. पुजारी सर, रौप्यमहोत्सव समितीचे अध्यक्ष श्री. संजय गंगाराम देसाई व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. विश्वास गोताड यांनी केले आहे.

श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असून या वर्षातील हा दुसरा मेळावा असून सर्वच आजी माजी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 06-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow