रत्नागिरी : वरवडेच्या विकासासाठी १४ कोटींचा निधी : पालकमंत्री उदय सामंत

Jul 29, 2024 - 12:01
Jul 29, 2024 - 17:07
 0
रत्नागिरी : वरवडेच्या विकासासाठी १४ कोटींचा निधी : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : वरवडे गावच्या विकासासाठी १४ कोटींचा निधी दिला असून, हे आपल भाग्य आहे. वरवडे गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांची गावातून शाळेपर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढली.

पालकमंत्री सामंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ते म्हणाले की, वरवडे गावच्या विकासासाठी तब्बल १४ कोटीची विकासकामे करण्याचे भाग्य माझ्या सारख्या आमदाराला मिळाले. मी ज्या गावाच्या विकासासाठी निधी दिला. त्या आमदाराचे स्वागत आपण वाजत गाजत केलात त्यात मला खूप आंनद झाला. वरवडे गावाच्या विकासासाठी तुमचा आमदार रत्नागिरीचा पालकमंत्री म्हणून एक ही रुपयाचा निधी कमी पडणार नसल्याचा शब्द यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला. आपल्यावर वरवडेवासियांचे किती प्रेम आहे हे येथील उपस्थितीने दाखवून दिली. वरवडे गावातील ही मिरवणूक माझ्या येणाऱ्या निवडणुकीची विजयी मिरवणूक आहे असे बोललो तर वावगे ठरणार नाही. या मिरवणुकीत लहान मुले, युवक, युक्ती, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक असा संपूर्ण गाव सहभागी झाला होता.

यावेळी स्त्नागिरी विधानसभा मतदार संघातील निरीक्षक राजेश मोरे, उपजिल्हा प्रमुख प्रकाश साळवी, तालुका प्रमुख बाबू म्हाप, महिला तालुका प्रमुख कांचन नागवेकर, विष्णू पवार, योगेंद्र कल्याणकर, सरपंच विराग पारकर, गावातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:30 PM 29/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow