लांजा : साटवली-लावगणवाडीतील विद्युतखांब धोकादायक

Sep 10, 2024 - 11:59
 0
लांजा :  साटवली-लावगणवाडीतील विद्युतखांब धोकादायक

लांजा : तालुक्यातील सारवली-लावगणवाडी येथे भरवस्तीत असलेला विद्युतखांब गंजून गेला आहे. तो केव्हाही कोसळेल अशी स्थिती आहे. धोकादायक बनलेला विद्युतखांब तत्काळ बदलावा, अशी मागणी साठवली तंटामुक्ती समिती अध्यक्ष चिंतामणी सावंत यांनी केली आहे. 

साटवली लावगणवाडी येथे वसंत गुंडघे यांच्या घराजवळ हे आणि लोकवस्तीतील विद्युत खांब गंजून गेला आहे. वादळी वारा किंवा पावसात केव्हाही कोसळून दुर्घटना घडू शकेल, हे अशा स्थितीत आहे. या विद्युतखांबावरून आजुबाजूच्या घरांना वीजजोडण्या दिलेल्या आहेत. हा विद्युतखांब येथील लोकांसाठी मृत्यूची टांगती तलवार बनला आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या विद्युतखांबाची पाहणी करून तत्काळ बदलावा, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. त्यात चालढकल केल्यास आणि एखादी दुर्घटना घडली तर त्याला महावितरण जबाबदार राहील, असा इशाराही दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 9/10/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow