दहावी, बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

Jul 13, 2024 - 11:24
 0
दहावी, बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावीची माध्यमिक शालांत परीक्षा व इयत्ता बारावीची उच्च माध्यमिक परीक्षा १६ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार असून या काळात प्रतिबंधात्मक आदेश पारीत केला आहे.

इयत्ता दहावीची परीक्षा फाटक हायस्कूल, सुभाष रोड, ता.जि. रत्नागिरी, युनायटेड इंग्लिश स्कूल ता. चिपळूण जि. रत्नागिरी, अल्फ्रेड गॉडने हायस्कूल ता. दापोली जि. रत्नागिरी, राजापूर हायस्कूल ता. राजापूर जि. रत्नागिरी या परीक्षा केंद्रावर १६ जुलै २०२४ ते ३० जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. इयत्ता बारावीची उच्च माध्यमिक परीक्षा कै. पी. जी. अभ्यंकर आर्टस् व कॉमर्स अँड आर. बी. कुलकर्णी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ता. जि. रत्नागिरी, डी.बी.जे. कॉलेज ता.चिपळूण जि. रत्नागिरी, एन. के. वराडकर कला व बेलोसे वाणिज्य महाविद्यालय दापोली ता. दापोली जि. रत्नागिरी या परीक्षा केंद्रावर १६ जुलै ते ०६ ऑगस्ट २०२४ या कालावधीत होणार आहे.

परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश पारीत केला आहे. या आदेशान्वये परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल, असे कृत्य करता येणार नाही. १०० मीटर परिसरातील एस.टी.डी. बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनिक्षेपण इ. माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहील, असे कळवण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 13/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow