लांजा : वीरगाव येथे आढळली २३ कातळशिल्पे

Sep 10, 2024 - 13:56
 0
लांजा :  वीरगाव येथे आढळली २३ कातळशिल्पे

लांजा : तालुक्यातील वीरगाव येथे पिंपळाची बाऊल परिसरात एक आणि सुकाड येथे बावीस अशी २३ कातळशिल्पे शोधण्यात स्थानिक तरुणांसह अभ्यासकांना यश आले आहे. कातळशिल्पे अश्मयुगीन कालखंडातील असून, त्यांच्या अभ्यासाला महत्व आहे. तज्ज्ञांच्या मते हो कातळशिल्पे अश्मयुगीन असून, त्यांचा कालखंड दहा ते बारा हजार वर्षे इतका पुरातन आहे.

वीरगाव येथे पिंपळाची बाऊल इथे एक शिल्प आणि सुकाड येथे २२ शिल्पे विद्यार्थी संशोधक मिलनाथ पालेरे, सुचारिता चौधरी आणि वेदवर्शिनी एस. आर. यांनी बोरगाव येथील योगेश पातेरे, सिद्धेश वीर आणि इतर शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने शोधून काढली  या शिल्पांमध्ये जलचर, भूचर या व्यतिरिक्त पक्षी, मानवाकृती शिल्प, गोपद्य आणि अनाकलनीय चित्रे कोरली गेली आहेत. त्यामध्ये मुख्यतः मासे, गरुड पक्षी, ससा, कांडेचोर, विल्डबिस्त (काळवीट), डुक्कर, मानवाकृती आणखी काही चित्रे कोरलेली आहेत, गरुड पक्षी सुमारे अडीच मीटर लांबीचा आहे. मानवाकृती आकृती स्थानिक देवता म्हणून ओळखली जाते. पिंपळाची बाऊलमधील चित्रे सुमारे एक मीटर लांब आणि दीड मीटर रुंदीचे आहे. त्यांचे आकलन अजून झालेले नाही. मागील काही वर्षांपासून कोकण किनारपट्टी आणि त्या जवळील परिसराच्या जांभ्या सत्यावर कोरीव कातळशिल्पे संतोषक आणि पर्यटकांच्या निदर्शनात येत आहेत. त्यामुळे देशी आणि विदेश पर्यटक, अभ्यासकांचे लक्ष कोकणातील सडयावर वेधले गेले आहे. दरम्यान, मिलनाथ पातेरे यांनी डेक्कन येथे आर्कियोलॉजी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यानंतर ते वीरगाव येथे आले. रत्नागिरी जिल्ह्यातील कातळशिल्प अभ्यासक सुधीर रिसबूड यांच्याही संपर्कात आहेत. विरगाव येथील स्थानिक विद्याथ्यांच्या मदतीने त्यांनी लांजा तालुक्यातील कातळशिल्पांचा शोध घेतला आहे. आजुबाजू‌ला अनेक कातळशिल्पे असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकणातील कातळशिल्पांना राज्य शासनाकडून संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे या शिल्पांना पर्यटनदृष्टीने तसेच अभ्यासूदुष्टीने पाहणे अधिक उत्तम होईल आणि त्यांच्या संवर्धनाकडेही लक्ष देता येईल. त्यामुळे येथील ग्रामीण जीवन विकासाच्या प्रवाहात वेग धरेल आणि विशेष म्हणजे कोकणाच्या प्रागैतिहासिक इतिहासामध्ये मोलाची भर पडेल. मिलनाथ पातेरे, अभ्यासक
आहेत.

कातळशिल्प स्थानिक देवता
 वीरगाव येथील मानवाकृती कातळशिल्पाला स्थानिक देवता म्हणून पाहिले जाते. या संबंधित दोन दंतकथा प्रचलित आहेत. पहिली कथा अशी आहे की, बाजूच्या गावातील स्त्री या ठिकाणाहून जात असताना काही वाटेतील चोरांनी तिची लूटमार केली आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. दुसन्या कथेत तीच स्त्री तिच्या प्रसूतीसमयी तिच्या घरी जाताना या ठिकाणी पुत्र प्रवसली , तिचा मृत्यू झाला, असे सांगितले आहे. पुढे तिच्या मुलाने हे शिल्प कोरले. गावातीललोक येता-जाता दर्शन घेतात आणि तिच्यावर अंजनी झाडाच्या फांद्या तोडून सावली म्हणून ठेवतात. लोके इथं मूलबाळ व सुखासाठी करत असल्याचे स्थानिकांनी अभ्यासक पातेरे यांना सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:23 PM 9/10/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow