नारायण राणेंना विजयी करून जनतेने कोकणची प्रतिष्ठा जपली; दीपक केसरकर

Jun 5, 2024 - 15:35
Jun 5, 2024 - 15:38
 0
नारायण राणेंना विजयी करून जनतेने कोकणची प्रतिष्ठा जपली; दीपक केसरकर

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विजयी करून जनतेने कोकणची प्रतिष्ठा जपली, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. मतांचे ध्रुवीकरण, एका समाजाच्या लोकांनी केलेला विरोध, खोटा प्रचार या कारणांमुळे महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही, असे त्यांनी सांगितले.

श्री. केसरकर यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली, तेव्हा ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर उपस्थित होते. श्री, केसरकर म्हणाले, "श्री. राणे यांच्या विजयासाठी राणे कुटुंबीय सौ. नीलम राणे, नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण मंत्री उदय सामंत तसेच महायुतीचे मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी चांगल्या पद्धतीने काम केले. त्या सर्वांचे आभार मानतो. कोकणच्या सुपुत्राला भारताची सेवा करण्यासाठी संसदेत जाण्याचे स्वप्न पूर्ण केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे.''

ते पुढे म्हणाले, "कोकणात महायुतीचे उमेदवार विजयी झाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मतांचा कौल मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पाकिस्तानमधून दीपक केसरकर प्रचार त्यामुळे एका समाजाने महायुतीला स्वीकारले नाही. पाकिस्तानी कट पंतप्रधान मोदी यांनी उधळून लावला आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे मी अभिनंदन करतो. भारताच्या विकासासाठी आवा नवीन ऊर्जा घेऊन एनडीए काम करेल. महाराष्ट्रत फोडाफोडीमुळे नव्हे, तर एका समाजाच्या लोकांनी मादानविरोधी काम केल्याने मुंबई, राज्यात अनेक ठिकाणी परिणाम जाणवला."

ते म्हणाले, "महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षण, ओबीसी, कांदा निर्यात बंदी, संविधान बदलणार अशा मोठ्या प्रकाराला महाराष्ट्रातील मतदार बळी पडले. त्यामुळे ध्रुवीकरण मतांचे झाले. शिवसेनेच्या सर्व आमदारांच्या मतदारसंघात उमेदवारांना मताधिक्य मिळाले आहे, शिवाय लोकसभा निवडणूक आणि विधानसभा मतदारसंघ यांचे गणित स्वतंत्र आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिणाम जाणवणार नाही. मंत्री उदय सामंत व किरण सामंत यांनी चांगले काम केले आहे. "जिथे दीपक केसरकर तेथे यश असे विचारले असता त्यांनी साईबाबांच्या कृपेने हे सर्व यश प्राप्त झाले, असे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:03 PM 05/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow