शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधली असं म्हणणे इतिहासाचे विकृतीकरण : जितेंद्र आव्हाड

Sep 10, 2024 - 16:41
 0
शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधली असं म्हणणे इतिहासाचे विकृतीकरण : जितेंद्र आव्हाड

मुंबई : शिवजयंती (Shiv Jayanti) उत्सवसुद्धा महात्मा फुलेंनीच (Mahatma Phule) सुरू केला हा सुद्धा इतिहास आहे,असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले आहे.

मोहन भागवतांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. झाडाझुडपात भरलेली समाधी ही महात्मा जोतिबा फुले यांनीच शोधली आहे. तुम्ही इतिहासाचे विकृतीकरण करत आहात, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, मोहन भागवतजी इतिहासाच्या कुठल्याही पानावर लिहिलेले नाही की, छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी शोधून काढली. वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी महात्मा जोतिबा फुले यांनी शोधून काढल्याबाबत कोणत्याही इतिहासकारांमध्ये मतभेद नाहीत. ही समाधी त्यांनी अत्यंत कष्टाने शोधून काढली. झाडाझुडपात लपलेली ही समाधी शोधत असताना तेथील मनुवाद्यांनी महात्मा फुले यांना त्रासदेखील दिला होता. पण, या मनुवाद्यांना न जुमानता छत्रपती शिवरायांची समाधी व्यवस्थित करून घेतली ती फक्त आणि फक्त महात्मा जोतिबा फुले यांनीच! आपण जे बोलता त्यालाच आम्ही इतिहासाचे विकृतीकरण म्हणतो.

शिवजयंती उत्सव फुलेंनीच सुरू केला : छगन भुजबळ

छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही महात्मा जोतीराव फुले यांनी शोधून काढली हा इतिहास कोणालाही बदलता येणार नाही त्याचप्रमाणे शिवजयंती उत्सवसुद्धा हा महात्मा जोतीराव फुलेंनीच सुरू केला त इतिहास आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

काय म्हणाले मोहन भागवत?

शिवाजी महाराज इथेच होऊन गेले. त्यांचं स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं. रायगडावर उत्सव सुरू केला. टिळकांनी ते सगळं शोधून काढलं. धर्म ही आपली मूळ प्रेरणा आहे. तो आपला प्राण आहे. तो स्वीकारला तरच राष्ट्राचे उत्थान होते. अन्यथा देशाचा अधःपात होतो. धर्माविषयीचा तपशील महत्वाचा आहे. आज राष्ट्र मोठं होत असल्याचे ज्यांना पाहवत नाही त्यांच्याकडून धर्मावर वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या रूपात आक्रमण होत आहे. मात्र त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपण समर्थ आहोत. तंजावरचे मराठे हे पुस्तक त्यासाठी प्रेरणा ठरणार आहे, असे मोहन भागवत म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:09 10-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow