एससी, एसटी आरक्षणाबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाला ॲड. गुणरत्न सदावर्ते देणार आव्हान

Aug 2, 2024 - 14:16
 0
एससी, एसटी आरक्षणाबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाला ॲड. गुणरत्न सदावर्ते देणार आव्हान

वी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातींच्या (एसटी) आरक्षणाबाबत दिलेल्या निकालाला मुंबईतील वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते (GunratnaSadavarte) हे आव्हान देणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा असून राज्यांतील आगामी निवडणूकांवर प्रभाव टाकणारा असल्याचा दावा वकील डॉ.सदावर्ते यांनी केला आहे. तसेच कायदा करण्याचा अधिकार हा संसदेचा असून कोर्ट त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असाही दावा सदावर्तेंनी केला आहे. परिणामी, आरक्षणाबाबतचा न्यायालयीन लढा सुरूच ठेवण्याचा पवित्रा आता सदावर्ते यांनी घेतला आहे.

हा निकाल म्हणजे आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा- डॉ. गुणरत्न सदावर्ते

दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातींबाबत (एसटी) एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्यानुसार आता प्रत्येक राज्याला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये वर्गवारी करुन आरक्षणाचा प्राधान्यक्रम ठरवण्याचा अधिकार मिळाला आहे. यापूर्वी 2004 साली सर्वोच्च न्यायालयानेच राज्यांना एससी आणि एनटी प्रवर्गात वर्गवारी करण्याचा अधिकार देता येणार नाही, असा निकाल दिला होता. मात्र, गुरुवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयातील सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सहा विरुद्ध एक अशा मताधिक्याने राज्यांना एससी आणि एसटी प्रवर्गात वर्गवारी करण्याच्या अधिकाराला मंजुरी दिली. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अशातच या निकालाला आव्हान देण्याचा पवित्रा मुंबईतील वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी घेतला आहे.

एससी आणि एसटीला क्रिमीलेअरचे निकष लागू

आतापर्यंत ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना क्रिमीलेअरचे निकष लागू होते. त्यानुसार ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना ओबीसी प्रवर्गातील लोकांना आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता. आता हेच निकष एससी आणि एसटी प्रवर्गासाठीही लागू होणार आहेत. त्यामुळे एससी आणि एसटीमध्येही क्रिमीलेअर आणि नॉन-क्रीमिलेअर अशी वर्गवारी होईल. त्यामुळे एससी आणि एसटीमध्ये प्रवर्गातही क्रिमीलेअर वर्गात मोडणाऱ्यांना आरक्षणाचे सर्व लाभ मिळणार नाहीत.

काय आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय ?

* अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणात वर्गवारी करता येते . अनुसूचित जाती, जमातीतील उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टाची मान्यता. सुप्रीम कोर्टाने 6 विरूद्ध 1 अशा बहुमताने दिला निकाल

* इंपेरिकल डेटा गोळा करुन सरकारला जातीबाबत झालेला भेदभाव दूर करता येईल

* सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशांसाठी वर्गवारी करता येईल

* न्यायमूर्तींच्या घटनापीठाचा ६ विरुद्ध १ असा बहुमताने निर्णय

* न्या.बेला त्रिवेदी मात्र वर्गवारीविरोधात. वर्गवारी योग्य ठरवणाऱ्या सहा न्यायमूर्तींचे पाच स्वतंत्र मतं देणारे निकाल


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:46 02-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow