चिपळुणातून ३३० एसटीचे बुकिंग फुल्ल

Sep 11, 2024 - 15:24
 0
चिपळुणातून ३३० एसटीचे बुकिंग फुल्ल

चिपळूण : गणेशोत्सव साजरा केल्यानंतर शहराकडे परतणाऱ्या गणेशभक्तांसाठी चिपळूण आगारातून ३३० एसटीचे बुकिंग झाले आहे. यातून सुमारे १५ हजार गणेशभक्त परतीचा प्रवास करणार आहेत, अशी माहिती चिपळूण आगाराचे आगार प्रमुख दीपक चव्हाण यांनी दिली.

ते  म्हणाले, गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या चाकरमान्यांना एसटीने चांगली सुविधा दिली. एसटीमुळे विनाअपघात सुखरूपपणे गणेशभक्त आपल्या गावी आले. गणेशोत्सव साजरा केल्यानंतर शहराकडे परतणाऱ्या प्रवाशांनी एसटीला प्राधान्य दिले आहे. एका एसटीमध्ये ४२ ते ५० प्रवासी बसण्याची क्षमता असते. अशा ३३० एसटी आरक्षित झाल्या आहेत. या फेऱ्या मुंबई, ठाणे, पुणे, बोरवली , पिंपरी चिंचवड, विरार आदी भागात सोडल्या जाणार आहेत. एसटीच्या प्रवासावर प्रवाशांचा भरोसा आहे. त्यामुळे अजूनही गणेशभक्त एसटीचे आरक्षण करत आहेत. अशा लोकांसाठी आम्ही एसटीच्या फेऱ्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत, एका गावातून किमान ४० प्रवासी आरक्षण करणार असतील तर त्या गावातून एसटी सोडण्याचा आमचा प्रयत्न राहील तसेच करंट बुकिंगही चालू केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:51 PM 9/11/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow