रत्नागिरी : अवकाळी पावसाने महावितरणला दीड कोटींचा फटका

May 25, 2024 - 12:02
 0
रत्नागिरी : अवकाळी पावसाने महावितरणला दीड कोटींचा फटका

रत्नागिरी : वादळी वाऱ्यासह मागील दोन दिवसांत झालेल्या वळवाच्या पावसाने चिपळूण, खेड, लांजा, राजापूर, सावर्डे आदी भागात महावितरणच्या ४०० विद्युत खांबांसह सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दुरुस्तीसाठी महावितरणचे कर्मचारी मेहनत घेत आहेत.

जिल्ह्यात साधारण सरासरी ३,२६४ मि.मी. पाऊस पडतो. १ जूनपासून याची नोंद केली जाते. आता साधारण ३९.५ मि.मी. अवकाळी पाऊस झाला आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात विविध भागांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शहरीसह ग्रामीण भागातही मोठ्या नुकसानाला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच सर्वाधिक फटका शासनाच्या महावितरणला बसला आहे. वादळी वाऱ्यांमुळे अनेक भागात झाडे पडून तारा तुटल्या, वीज खांब कोलमडून मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात महावितरणाला अधिक नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. वादळी वाऱ्यामुळे तुरंबव, सावर्डेमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्राहक अंधारत होते. तुरंबव येथील विद्युत पुरवठा सुरळीत झाला. उर्वरित ठिकाणांचाही पूरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे. लांज्यातही दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित होता, तो सुरू करण्यात आला आहे. यामध्ये महावितरणचे डीपी, विद्युत खांब आदीचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये महावितरणचे ४०० विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी २०० खांबांची दुरुस्ती झाली आहे.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 25-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow