दापोली : केळशीत रंगला पेटत्या पलित्यांचा नाच

Sep 13, 2024 - 09:55
Sep 13, 2024 - 10:00
 0
दापोली : केळशीत रंगला पेटत्या पलित्यांचा नाच

दापोली : वेगवेगळ्या अनेक ग्रामीण कोकणी ढंगातील लयबद्ध चालीवरील गौरी-गणपतीची गाणी गात पेटत्या मशालीचा साहसी पलित्यांच्या  पारंपरिक नाच केळशी गावामध्ये रंगला. यावेळी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. पेटल्या पलित्यांच्या उजेडाने परिसर उजळून गेला होता.

दापोली तालुक्यातील केळशी गावात गणेशोत्सवात गौराईचे आगमन झाल्यावर पेटते पलिते घेऊन नृत्य करायची पिल्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. पारंपरिक पद्धतीचा पलित्यांचा हा नाच गौरी पूजनच्या रात्री रंगला. माहेरवाशीण गौराईला मानवंदना देण्यासाठी पेटलेला पलिता हाती घेऊन ढोल-सनईच्या तालावर श्री कालभैरवाच्या साक्षीने रंगलेल्या सामूहिक पलित्यांचा या नाचने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. या नृत्यात सर्वांत पुढील व्यक्ती मशाल घेऊन असते. बाकीच्यांच्या हातात पलिते असतात.

केळशी गावातील सर्व वाडीतील ग्रामस्थ पांढरा सदरा, घोतर लेगा आणि डोक्यावर टोपी परिधान करून हातात धगधगत्या मशाली आणि पलिते घेऊन सनई ढोलकीच्या तालावर नाचू लागले. पेटते पलिते हातात घेऊन "आलेली गवर फुलून जाम, माळ्यावर बसून पोळ्या खाय" या गाण्यावर गावातील श्रीकालभैरव मंदिराजवळ एकत्र येऊन पलित्यांचा नाच सुरू होता. हातात पेटते पलिते घेऊन डोलाच्या तालावर बेभान नाचणारे लोक हे या नावाचे आगळे वैशिष्ट्य आहे, प्रत्येक आळीचा पलित्यांचा नाच हा वेगवेगळा निघतो. ते सर्व नाच भैरीच्या फरासावा येतात. प्रत्येकाच्या हातात पेटलेले पलिते होते. त्यामुळे रात्रीच्या अंधारात अशी दिव्यांची ओळ बघणे आल्हाददायक होते. हा नाच पाहण्यासाठी दरवहन लोक केळशीमध्ये दाखल झाले होते.

पालित्याचा नाच हा केळशी गावचे वेगळे वैशिष्ट्य तसंच आकर्षणही आहे. या गावांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून गावामध्ये खेळला जात आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी बिलकुल पोलिस अथवा इतर कोणताही बंदोबस्त नसतो. संपूर्ण नाच हा निर्विघ्नपणे पार पाडतो. बुधवारी (ता. ११) रात्री ९ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि साधारण १०.३० च्या दरम्यान हा कार्यक्रम संपला. केळशी गावातील ९ पालिल्यांचे नाच ग्रामदैवत कालभैरव मंदिराजवळ एकत्र आले. याठिकाणी नाच सादर करून पुढे जय हिंद चौकामध्ये सर्वांनी एकत्र नाचाचा आनंद लुटला. पुढे आपापल्या वाडीमध्ये जाऊन नाचाची समाप्ती केली. जीवन सुर्वे, ग्रामस्थ

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 9/13/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow